भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

ब्रेकिंग : जळगाव मध्ये पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण, ४ तासानंतर सुटका, जिल्ह्यात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलिस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले असता चक्क पोलिस कर्मचाऱ्यालाच बंदूक लावून त्याचे अपहरण केले. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अखेर, ४ तासांच्या थरारानंतर पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आलं आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले उमर्टी गावात जळगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचारी गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करुन त्याला मध्य प्रदेशच्या सीमेत नेण्यात आले आहे. अपहरण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सोडविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी नावाची दोन गाव आहेत. त्यातील एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. त्यांनी महाराष्ट्रातील उमर्टी गावातून पोलिस कर्मचाऱ्याला अपहरण केले. आणि मध्यप्रदेशातील उमर्टी गावात घेऊन गेले.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात चोपडा ग्रामीण पोलीस एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जण पोलिसांवर धावून आले. त्या ठिकाणी त्यांचा वाद निर्माण झाला. पोलीस कर्मचारी व संबंधित गावात अवैध शस्त्र विक्री करणारे यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. वादानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याच अपहरण करण्यात आलं. त्या नंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला काही जणांनी सिमेच्या पलीकडे मध्य प्रदेशातील उमर्टी गावात घेऊन गेले होते .

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमर्टी गावाकडे रवाना झाले. पोलीस कर्मचाऱ्याला सुखरूप मिळवण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांची संपर्क सुरू होता.

अखेर अपह्रत पोलिस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन

या घटने नंतर जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी पोलिसांची मोठी कुमक रवाना केली होती. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अखेर ४  तासा नंतर अपहरणकर्त्यांनी अपह्रत पोलिस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी दिली आहे. मात्र या घटनेने पोलिस दला सह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!