क्राईमरावेर

ब्रेकिंग : खिरोदा – पाल घाटात भीषण अपघात, पिता – पुत्र ठार, आई – मुलगा गंभीर जखमी

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील खिरोदा – पाल घाटात दिनांक २७ रोजी रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चार चाकी मालगाडी MH २८ – १३१४ क्रमांकाचे वाहनाने एका MP ०९ x ७७७९ क्रमांकाच्या टू व्हीलर वाहनास धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात पिता-पुत्र ठार झाले असून पत्नी व पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ,पिंट्या मोहन भिलाला. वय ३५ वर्ष. व दितीक पिंट्या भीलाला .वय ४ वर्ष. दोघे रा.पाल तालुका रावेर हे दोघे या अपघातात ठार झाले. तर पत्नी पूजा पिंट्या भिलाला. वय ३० वर्षे. गंभीर जखमी, रोशन पिंट्या भीलाला. वय २ वर्ष. रा. पाल हे दोघे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तर चारचाकी वाहन चालक फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

सावदा पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम  व पुढील कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!