भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीयसामाजिक

ब्रेकिंग : पेट्रोल – डिझेल स्वस्त होणार? खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अंतर राष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. खनिज तेलाचे दर हे सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर उतरले आहे. कच्च्या तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल ७० डॉलर खाली आलेले आहेत. त्या मुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तविली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ओसरले असून, त्या परिणामी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात तेल विपणन कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली.

नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून उत्पादन वाढवण्याच्या ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेने निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती पिंपामागे ७० डॉलरखाली उतरल्या आहेत.

चीन आणि कॅनडा या दोन्ही देशांनी अमेरिकी वस्तूंवर जशास तसे कर लादून प्रत्युत्तर दिल्याने, व्यापार युद्ध तीव्र झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. व्यापार युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतींवर दबाव वाढला आहे. ओपेक प्लस देश एप्रिलपासून उत्पादन वाढवणार असल्याने तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्या मुळे आता पेट्रोल आणि डिझेल च्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!