दहा हजारांची लाच : पंचायत समितीच्या अभियंत्यासह दोघे एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी करणाऱ्या धरणगाव पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (३१) व खाजगी पंटर सागर शांताराम कोळी (३०, निंभोरा, ता.धरणगाव) यांच्याविरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जळगाव एसीबीने मंगळवार, ३ डिसेंबर रोजी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
यातील राकारदार यांना सन २०२४-२०२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. सदर योजनेतुन घरकुलचा पहीला हप्ता दिनांक ०३/०२/२०२५ रोजी रूपये १५,०००/- त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला असून, त्याप्रमाण त्यांनी त्यांच पराज काम केलले आहे. त्यांना मंजुर झालेल्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा झाला नसल्यान, त्याबाबत विचारपुस करण्यासाठी पंचायत समिती, धरणगाव येथे गल असता सदर घरकुल संबंधित काम करणार इंजिनियर श्री. गणेश पाटील यांना भेटुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सध्या निधी नसल्याचे सांगितले, परंतु त्यांचे गावातील लोकांकडुन माहीती मिळाली की, त्याचा घरकुलबा दुसरा हप्ता जमा झालेला आहे. म्हणून तक्रारदार दिनांक ०८/०७/२०२५ रोजी सकाळी ११. ०० वाजच्या सुमारास पंचायत समिती, धरणगाव येच जावुन पुन्हा गणेश पाटील यांची भेट घेवुन घरकुलाचा दुसरा हप्त्या बाबत विचारपुस केली. तेव्हा गणेश पाटील यांनी धरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदार यांच्याकड़े १०,०००/- रूपये लाचेची मागणी केलेबाबत त्यांनी दि. १४.०७.२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचे कडे तक्रार केली.
सदर तकारीची दि. १४.०७.२०२० रोजी पंचासमक्ष पडताळणी बोली असता लोकसेवक गणेश पाटील, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, धरणगाव यांनी तक्रारदार यांच्या पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या अंतर्गत मंजुर असलेल्या घरकुलाची दुसऱ्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकड पंचासमक्ष १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली, तसेच दिनांक १६/०७/२०२५ रोजी सागर काळी याचे मोबाईल फोनवरून सदरची लाय रक्कम सागर कोळी यांचे मार्फतीन स्विकारण्यास संमती दिली तसेच सागर कोळी (खाजगी इसम) याने लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवुन प्रोत्साहन दिले,
त्या नुसार १) गणेश संभाजी पाटील, वय ३१ वर्ष, व्यवसाय नोकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, धरणगावः (कंत्राटी).
२) सागर शांताराम कोळी, वय ३० वर्षे, चंदा शेती, रा. निंभोरा, ता, धरणगाव, जि. जळगाव (खाजगी इसम) यांचेवर धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. सदरची कारवाई योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, जळगांव, श्रीमती हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगाव, पोना /बाळ मराठे, पोका / राकेश दुसाने, पोकों/प्रणेश ठाकुर, पाकों/सचिन चाटे
यांनी केली.


