भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

३० हजारांची लाच : मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी एसीबी च्या ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |वाळूने भरलेले डंपर सोडल्याचा बदल्यात ५० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ३० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी व तलाठी यांना जळगाव एसीबी ने अटक केली आहे.

हकिकत अशी की, यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतुक करण्याचा व्यवसाय असुन यातील सदानंद व्यंकटी मुंडे, वय ३४ वर्षे, व्यवसाय नोकरी, तलाठी सजा ममुराबाद ता.जि. जळगांव वर्ग-०३.यांनी दि.०४.०२.२०२६ रोजी रात्रपाळी कर्तव्यावर असतांना रात्री १०.३० वा. गस्ती दरम्यान वाळूचे भरलेला डंपर पकडलेले होते. सदरचे डंपरbअभिजित नामदेव येवले वय ३९ वर्षे, व्यवसाय नोकरी, मंडळ, अधिकारी, सजा मसावद ता. जि. जळगांव वर्ग-०३. यांनी फोन केल्यानंतर त्यांचे सांगण्यावरुन सोडुन देण्यात आले होते. सदरचे वाळूचे डंपर सोडले व कारवाई केली नाही म्हणुन तलाठी सदानंद मुंडे व अभिजित नामदेव येवले यांनी ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केली.

परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ११/०२/२०२६ रोजी लाप्रवि, जळगाव येथे लेखी तक्रार दिली. त्याप्रमाणे प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता,
तलाठी सदानंद मुंडे व मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले. यांनी वाळूचे भरलेले डंपर सोडल्याचा मोबदल्यात व कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३०,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन सदरची लाच रक्कम सदानंद मुंडे यांनी स्वीकारली, म्हणुन सदानंद व्यंकटी मुंडे, तलाठी सजा ममुराबाद, व अभिजित नामदेव येवले, मंडळ अधिकारी सजा मसावद यांचेविरूध्द गुन्हा. सदरची कारवाई अभिजित येवले, मंडळ अधिकारी यांचे जुने जळगांव येथील घराचे खाजगी कार्यालयात करण्यात आली.

आरोपीची अंगझडतीत व बॅगेतुन खालील मुद्देमाल मिळुन आला
आरोपी क.१ सदानंद मुंडे तलाठी यांच्याकडे रोख ४०,२००/- रुपये व एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन.
तर आरोपी क.२ अभिजित येवले मंडळ अधिकारी
यांच्याकडे रोख ७६००/- रुपये व एक Vivo कंपनीचा मोबाईल फोन आढळून आला.

सदरची कारवाई पर्यवेक्षण व सापळा अधिकारी श्री. योगेश ठाकूर, पोलिस उपअधिक्षक, तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक, सापळा पथक श्रीमती रेश्मा अवतारे, GPSI सुरेश पाटील, चालक, पोना/बाळु मराठे, पोकों/राकेश दुसाने, पोकों/प्रदिप पोळ, पोकों/चंद्रशेखर चौधरी, यांनी यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!