सावदा पोलीस स्टेशनला माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचेवर गुन्हा दाखल
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशनला शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते व माजी मंत्री विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास आमदार एकनाथराव खडसे हे सावदा पोलिस ठाण्यात आले होते. एका उत्खनन प्रकरणा गुन्हा नोंद न केल्या प्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी जोरदार वादावादी झाली.
या दरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.,या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे

