भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

४० हजारांची लाच : ग्रामविकास अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजर रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे यांना रंगेहात पकडले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत मोजे तामसवाडी ग्रामपंचायतचे रस्ता कॉंक्रिटी करणाचे पाच लक्ष किमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते. सदर झालेल्या कामाचे चार लाखाचे बिलाचा चेक साळुंखे  यांनी तक्रारदार यांना अदा करून सदरची रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती त्यानंतर तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे ७ दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तेथे ग्रामपंचायतीचे दिनेश साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या १० टक्के प्रमाणे ४०,००० रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दूरध्वनी द्वारे माहिती दिली होती.


सदर माहितीवरून ला.प्र.वि. धुळे पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेतली होती. सदर तक्रारीची दि. १९ मे २०२५ रोजी पडताळणी केली असता साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे ,४०,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम अंमळनेर येथे दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात स्वतः साळुंखे यांनी स्वीकारून दुचाकी वर पळून गेले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले असून दिनेश वासुदेव साळुंखे, वय – ५३ वर्ष, ग्रामपंचायत अधिकारी, तामसवाडी ग्रामपंचायत, ता. पारोळा, जि .जळगाव, ( वर्ग ३) रा. आई बंगला, भालेराव नगर, कॉटन मार्केटच्या मागे, अमळनेर, जि. जळगाव. त्यांचे विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे. रूपाली रा. खांडवी, पोलीस निरीक्षक. ला.प्र. विभाग, धुळे. पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल *सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!