भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

३०० कोटी कर्ज मंजुरी साठी ६४ कोटींची लाच, काय आहे प्रकरण?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |आयसीआयसीआय बँकेच्या ( ICICI BANK) माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांना व्हिडीओकॉन समूहातील एका कंपनीला ३०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी कोचर यांनी ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. अपीलीय लवादाने ३ जुलै रोजी या प्रकरणी निकाल देत चंदा कोचर यांना दोषी ठरवले आहे.

ज्या समितीने कर्ज मंजूर केले त्या समितीमध्ये चंदा कोचरही होत्या, परंतु त्यांनी ही बाब उघड केली नाही की ज्या कंपनीला ३०० कोटी रुपयांचे कर्ज दिले जात आहे, त्या कंपनीचे, दीपक कोचर यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. हे आयसीआयसीआय बँकेच्या हितासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते. २०२० साली याच प्रकरणात एका प्राधिकरणाने चंदा कोचर यांना मोठा दिलासा दिला होता. या प्राधिकरणाने कोचर आणि अन्य काही जणांची जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्यास परवानगी दिली होती. असे लवादाने म्हटले आहे .तसेच प्राधिकरणाच्या या आदेशावरही लवादाने ताशेरे ओढले आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने सादर केलेले पुरावे हे चंदा कोचर यांनी कर्ज मंजुरीसाठी लाच मागितल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे लवादाने म्हटलेले आहे. तसेच सेक्शन ५० अंतर्गत नोंदवलेल्या जबाबाशी हे पुरावे मिळत असल्याचेही लवादाने म्हटले आहे. लाचेची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी व्हिडीओकॉन समूहाच्या एसईपीएल आणि न्यूपॉवर रिन्यूएबल्स (NRPL) या कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. यातील एनआरपीएलवर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे नियंत्रण होते. कोचर दाम्पत्याने त्यांच्यावर वेळोवेळी लावलेले सगळे आरोप फेटाळले होते. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळानेही त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज किंवा इतर कोणत्याही कंपनीला कर्ज देताना हितसंबंधां संदर्भातील नियमांचे उल्लंघन झालेले नाही. असे बोर्डाने म्हटले होते. कोचर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आयसीआयसीआय बँकेतून करून त्यांनी या बँकेत ३३ वर्षे काम केले आणि एक काळ असा होता जेव्हा त्या खासगी बँकींग क्षेत्रातील शक्तिशाली महिला म्हणून ओळखल्या जात होत्या.

३०० कोटी कर्जाच्या बदल्यात ६४ कोटींची लाच घेतल्याच्या आरोपांनंतर चंदा कोचर यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी तपास पूर्ण होण्याची वाट न पाहता बँकेतून निर्धारित वेळेपूर्वीच निवृत्त होण्याची परवानगी मागितली होती, जी बँकेच्या मंडळाने मंजूर केली. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू असताना चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटकही केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!