भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून, रावेर तालुक्यातील घटना

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील आभोडा येथे आज सोमवार दि. ३१ रोजी
सकाळी उघडकीला आली. पत्नीचा खून करून पती स्वतःहून रावेर पोलीस स्टेशनला हजर झाला.

रावेर तालुक्यातील आभोडा येथे आशा संतोष तायडे (वय ३८ रा.आभोडा ता. रावेर) ह्या आपल्या पती व परिवारासह  मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होत्या. दरम्यान त्यांचे पती संतोष तायडे याने चारित्र्याच्या संशयावरून आशा हीचा गळा दाबून खून केला. ही घटना सोमवारी ३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पती हा स्वतःहून रावेर पोलीस स्टेशनला हजर झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!