भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बुलढाणा

हनुमान जयंती : जगातील विशालकाय सर्वात उंच 105 फूट ” हनुमान ” मूर्तीची वैशिष्ट्ये,इतिहास

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

बुलढाणा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील ” नांदुरा ” एक छोटंसं गाव, असं म्हटलं जातं, मूर्ती लहान कीर्ती महान, पण इथे ‘ गाव लहान , कीर्ती महान सोबतच मूर्तीही महान’. या गावाच मोठं वैशिष्ट्य या गावात जगातील सर्वात उंच व विशालकाय 105 फुटाची हनुमानाची मूर्ती….! आता ” नांदुरा ” या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे आणि ती म्हणजे “हनुमान नगरी“!

नांदुरा येथील ही 105 फूट मूर्तीचा मोठा इतिहास आहे
गेल्या कित्येक वर्षा पूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एक शेतकरी नागपूर येथे बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी गेला असता आंध्रप्रदेशातील शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याला तो कांद्याचा दर्जा आवडला असता त्याने चौकशी केली असता नांदुरा येथील असल्याचे सांगितले. आंध्रप्रदेशातील शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचंही ठरवलं. मोहनराव हे बलाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी बालाजी ट्रस्ट स्थापन केलं. “हनुमान” हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य व विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता , त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून मूर्तिकार आणून ही मूर्ती घडविली. या मूर्तीच्या बाजूलाच बालाजीचे भव्य असे मंदिरही उभे केले. ही 105 फूट उंच विशालकाय मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 210 दिवस लागले, आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील “जॉन बाबू” या मुर्तीकाराने ही अतिशय सुंदर व सुबक मूर्ती तयार केली, मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे. मूर्तीमध्ये 1 इंच ते 12 इंच  साईझ चे जवळपास एक हजार कृत्रिम डायमंड लावलेले आहेत. मूर्तीचे डोळे 27 इंच बाय 24 इंच या आकाराचे असून मानवाचे कृत्रिम डोळे बनविणाऱ्या कंपनीत ते बनविले गेले आहेत. मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मूर्तीला साडे तीन क्विंटलचा हार रिमोट द्वारे चढविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे, हनुमान हे बालाजींचे भक्त असल्याने शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बालाजी मंदिर बनविण्यात आलं.दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आजही हनुमान जयंती असल्याने हजारो भक्त याठिकाणी सकाळ पासूनच पूजा अर्चा करण्यासाठी आले आहेत.

गिनीज बुक ऑफ लिम्का मध्ये मूर्तीची नोंद
एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिम्का ने सुद्धा दखल घेतली असून नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!