ग्राहकांना दणका : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ३९ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडर मध्ये झालेली आहे. दिल्लीत १९ किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हा १,६९१.५० रुपयांना मिळणार आहे.
ही दरवाढ केवळ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मधे आहे.तर घरगुती गॅस सिलिंडर चे दर ‘जैसे थे’ आहेत.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायांना चालना देण्याकरिता १ जुलैला गॅस सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी केली होती. तेव्हा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर हा १६४६ रुपये होता.१ जूनला ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आणखी दर कमी केले होते. त्यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरचा दर ६९ .,५० रुपयांनी कमी होऊन १६७६ रुपये होते. यापूर्वी १ मे २०२४ रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १९ रुपयांनी कपात करण्यात आली होती.