दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात मागवला केक? कशाचं सेलिब्रेशन?
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काश्मीर मधील पहलगाव मध्ये २६ निष्पाप पर्यटकांची दहशत वाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. त्या दुःखात संपूर्ण भारत देश असताना सर्वीकडे शोक व पाकिस्तान वर संताप व्यक्त केला जात असताना दिल्लीतील
पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एका पाकिस्तानी व्यक्तीला केकचा बॉक्स घेऊन जात असताना प्रसारमाध्यमांनी पाहिले आणि त्याला घेराव घातला. त्याच्या हातात केकचा बॉक्स होता. त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा केक कशासाठी घेऊन जात आहे, कशाचे सेलिब्रेशन पाकिस्तान उच्चायुक्तालयात केले जाणार आहे, या बद्दल त्याला विचारले, मात्र पाकिस्तानी कर्मचाऱ्याने एकाही प्रश्नाचे उत्तर माध्यमांना दिले नाही.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो बाजु बाजुने वाट काढत पुढे जात होता. व तो कर्मचारी केकचा बॉक्स घेऊन
पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या मुख्य द्वारातून आतामध्ये गेला.. अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होताच लोक प्रचंड चिडले व संताप व्यक्त करत आहेत.
एकीकडे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कट कारस्थान पाकिस्तानामध्ये शिजल्याची दाट शक्यता असतानाच आधीच तीव्र संताप व्यक्त होत असताना नेटकरी याला पहलगाम हल्ल्याशी देखील जोडत असून दुसरीकडे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक मागवण्यात येऊन नेमकं कोणत्या गोष्टीचं, कुठले सेलीब्रेशन केले जात आहे. असेही नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे.