भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

वरणगाव, ता. भुसावळ. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारातील गट नंबर ७८३ मधील शेतातील विहिरीत पडल्याने येथील भंगाळे वाडा येथील रहिवासी योगीता धीरज भंगाळे (वय ३५ वर्ष ) यांचा गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादी वरून या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास योगिता भंगाळे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी याआधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुभाष वराडे यांनी याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महिलेचे पती धिरज कडू भंगाळे (रा. भंगाळे वाडा, वरणगाव) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत योगीता भंगाळे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार असून या घटने मुळे वरणगाव येथील भंगाळे वाडा तसेच त्यांचे माहेर असलेल्या काहुरखेडा गावात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!