रावेर मध्ये गोवंश तस्करी, दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यात गोवंश तस्करी थांबता थांबत नाहीयं. गाईंची सतत कोणत्या ना कोणत्या मार्गे तस्करी होतच असते. रावेर शहरात मध्यरात्री निर्दयीपणे दोन गायी व एका वासराला वाहनात कोंबून गायींची तस्करी करणारे टाटा मॅजिक क्र. MH01BR 1143 हे वाहन पोलिसांनी पकडले. या वाहनातून दोन गाई व एक वासरू आणि वाहन असा सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, गोवंश तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाली. त्या नुसार दोन गायी व एका वासराला निर्दयतेने कोंबून जुना सावदा रस्ताने रावेर शहरातुन सावदाकडे वाहतुक करीत असताना टाटा मॅजिक क्र. MH01BR 1143 हे वाहन थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता वाहनातून दोन गाई व एका वासराची सुटका केली.
वाहन जप्त करून गाई व वासराला गो शाळेत रवाना करून महेश महाजन यांच्या फिर्यादीवरून गाडी चालक सय्यद गफुर व त्याचा साथीदार मनोज महाजन यांच्याविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.