भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यात ट्रॅक्टर खाली दाबल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेतातून ट्रॅक्टर च्या ट्रॉलीत तूर भरून आणत असताना ट्रॅक्टर अचानक उलटले. त्यात सुनील भिका कोळी. वय ३९ वर्ष. रा अटवाडे, ता रावेर. हे शेतकरी ट्रॅक्टरच्या धुडाखाली दाबले जाऊन या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील अटवाडे या गावाच्या शेत शिवारातील शेतात रविवार रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.

या संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला किरण सोपान कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन डामरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!