क्राईमचाळीसगाव

धक्कादायक : धारदार शस्त्राने पोलिसाचा खून

चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार करीत पोलिसाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात आज रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळील पाटणादेवी नाक्याजवळ आज रविवार दि. १४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शुभम आगोणे या पोलीस असलेल्या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केल्याने त्यात शुभम गंभीर जखमी झाला त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

अधिक चौकशी केली असता मयत शुभमआगोणे हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असून क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!