क्राईमचाळीसगाव

ब्रेकिंग न्युज ; चाळीसगावला माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार

चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। चाळीसगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर आज बुधवार रोजी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. दरम्यान त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या रेल्वे स्टेशन येथे कारमधून आलेल्या तीन ते चार तरुणांनी अंदाधुंद गोळीबार करून माजी नगरसेवक बाळू मोरे यांना गंभीर जखमी केले आहे. चाळीसगाव येथे गोळीबार झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी दि. ७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्तीय भाग असलेले रेल्वे स्टेशन येथे हि घटना घडली. यात सुमारे तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले आहे. गोळीबार करणारे मारेकरी चारचाकी कारमधून फरार झाले. या घटनेने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हादरली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!