क्राईमचाळीसगाव

आरोग्याला लाचेची किळ, ५० हजारांच्या लाचेची मागणी,आरोग्य अधिकारी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम किसन लांडे (वय-५३) यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

अधिक माहिती अशी की, घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्यासाठी जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला चाळीसगाव येथील रहिवासी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. देवराम लांडे हे कारभार पाहत होते. त्यानंतर तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी डॉ. लांडे यांनी ५० हजाराची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर डॉ. लांडे यांची पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून बदली झाली होती. लाचलुचपत विभागाने कारवाईसाठी सापळा रचला.

तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी तथा तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम किसन लांडे (वय-५३) याना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, सदरची ही कारवाई धुळे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, शरद कटके, पोलीस शिपाई संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे यांच्यासह आदींनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!