सात हजाराची लाच घेताना चाळीसगाव आश्रम शाळेच्या ग्रंथपालाला रंगेहात अटक
चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मा.प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नती चे थकीत रक्कम ८५,५१९ रुपये मंजूर करून आणून देतो. असे सांगत चाळीसगाव तालुक्यातील माध्यमिक आश्रम शाळा करगाव चे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार, वय ३८ वर्ष यांनी त्यासाठी फरकाचा बिलाच्या १६% प्रमाणे पंचासमक्ष १२,००० रुपयांची लाचेची मागणी करून यातील पहिला हप्ता म्हणून ७ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दि ६ आक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले.
या पूर्वी कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी श्रीकांत पवार यांनी या अगोदर फोन पे वर १५,००० रुपये घेतले होते. श्रीकांत गुलाब पवार, वय ३८, ग्रंथपाल माध्यमिक आश्रम शाळा करगाव ता. चाळीसगांव जि.जळगांव वर्ग-३ त्यांचे वर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
कारवाईत सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने, एन.एन. जाधव, पोलीस निरीक्षक, स.फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर हे सहभागी होते.