चिमुकली सोबत अश्लील चाळे,गुन्हा दाखल
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। चाळीसगाव शहरातील एका ६ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या काल्या उर्फ फारुक शेख फकीरा शेख याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० मे २०२२ रोजी सहा वर्षीय मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली असताना संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ताराबाई अहिरे यांच्या घरा शेजारी राहणारा काल्या उर्फ फारुक शेख फकीरा शेख याने त्याच्या घराबाहेर असलेल्या बाथरूममध्ये मुलीला नेऊन तिथं त्याने चिमुकली सोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला काल्या उर्फ फारुक शेख याच्याविरुद्ध मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.