साडे ७ लाखांच्या गुटखा पकडला, दोन तस्कर ताब्यात
जामनेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : तालुक्यातील जळगाव-नेरी रस्त्यावर बेकायदेशीर अवैध सुमारे साडे सात लाखांचा किंमतीचा गुटखा, पानमसाला, तंबाखूची वाहतूक करणारा कंटेनर एकूण १५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला असून सदरील कारवाईने खळबळ उडाली आहे.
- HSRP नंबर प्लेट : ३१ डिसेंबर हीच अंतिम मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- जळगावला ‘रेड अलर्ट’; पुढील २४ ते ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
- ब्रेकिंग : ७१ हजार ७०० रुपये लाच घेताना भूकरमापक, व डेटा एंट्री ऑपरेटर जळगाव एसीबी च्या ताब्यात
तालुक्यातील नेरी बुद्रुक ते नेरी टोल नाका दरम्यान बेकायदेशीररित्या गुटखा, पानमसाला, तंबाखूची कंटेनर (MH २० EL ७५५२) या क्रमांकाच्या वाहनातून नेण्यात येत असतात सोमवारी ३० मे रोजी सकाळी ६.३० वाजता पथकासह धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा गुटख्यासह सामान आणि ८ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १५ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी जामनेर पोलिसात पोहेकॉ तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोहेल जाफर शेख (वय २१) आणि सचिन शंकर बनकर (वय २६) दोन्ही रा. बालाजी नगर, औरंगाबाद या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे करीत आहे.





