क्राईमचाळीसगाव

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महिलेसह तिघांना अटक

चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। काम देण्याच्या बहाण्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला हॉटेल मालक व त्याच्या मित्राने धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी उघळकीस आली. चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेल मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून यात एका महिलेचाही समावेश आहे.सादर घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेल मालकाने पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक
व त्याठिकाणी उपस्थित असलेला त्याचा मित्र यांनी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत केला असून सदरची घटना १८ जानेवारी रोजी घडली असल्याची माहिती मिळत असून या बाबतची माहिती पीडित मुलींच्या नातेवाईकांनी शनिवारी संध्याकाळी पोलिसस्टेशन दिली. या संदर्भात पोलिसांनी हॉटेल मालक,व एका महिले सह तिघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोनी संदीप पाटील व सहकारी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!