चर्मकार समाजातर्फे विश्वभूषण, महामानव ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
जळगांव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथील 257, भास्कर मार्केट या ठिकाणी सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच मोठ्या संखेने उपस्थित समाजबांधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक बाळकृष्ण खिरोडे यांनी केले तर महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपण प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर,समाज भूषण पुरस्कार प्राप्त वसंतराव नेटके, चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे सर, काशिनाथ इंगळे, बाळकृष्ण खिरोडे,अँड. अर्जुन भारुळे, लिलाधर भारुळे, संजय बावस्कर, दिलीप दांडगे, कमलाकर ठोसर, यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी राजेंद्र बावस्कर, वसंतराव नेटके, संजय वानखेडे सर यांनी मनोगत व्यक्त करून विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक,राजकीय ,कृषिविषयक कार्याची माहिती सांगून समाजबांधवांनी डॉ.बाबासाहेबांचे विविध गुण आत्मसात करुन समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
या वेळेस नामदेव चिमकर, डी.जी.भारुळे, शिवदास कळसकर, प्रा. रवींद्र नेटके, पंकज तायडे, यशवंत सावकारे, रघुनाथ डोळे, सुभाष वडनेरे, भास्कर ठोसर, रामा सोनवणे, अशोक साळी,श्री.प्रवीण चौधरी, वीरेंद्रकुमार पाटील,आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय वानखेडे सर यांनी तर आभारप्रदर्शन काशिनाथ इंगळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण चौधरी, काशिनाथ इंगळे, संजय वानखेडे व चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.