भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

हरताळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | हरताळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळी लवकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर गावातून पारंपारिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकाच्या तालावर युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडविले. ठिकठिकाणी शिवचरित्रावरील घोषवाक्यांनी वातावरण शिवमय झाले होते.

कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रावर व्याख्यान, पोवाडा गायन आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि त्यांच्या आदर्शांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
पोलीस कर्मचारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र हवालदार संदीप वानखेडे यांच्या हस्ते शिव जयंती उत्सव समितीला देण्यात आले तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांना आरोग्य दूत म्हणून गौरविण्यात आले

हरताळा येथे शिवजयंती निमित्त पारंपारिकतेचा आणि एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव तायडे,अविनाश महाजन,अजय उदळकर,कमलेश भगत,अभिजीत देशमुख,महेंद्र तायडे,योगेश तायडे,भूषण कान्हे,कुणाल लोखंडे,निलेश मोरघडे,दीपक काळे,सुमित चौरे,तेजस वानखेडे,महेश भोईटे शिव जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश महाजन यांनी केले तर आभार वैभव तायडे यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!