भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडारावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयास तायक्वांदो स्पर्धेत रजत पदक

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत ऐनपूर महाविद्यालयाने रजत पदक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राचल विनोद कोळी हिने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने,प्रा डॉ. पी. आर. गवळी,प्रा अक्षय महाजन, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागीय स्पर्धा श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!