कुंभार खेडा येथे श्रीमद् दशावतार कथा व संकीर्तन सप्ताह
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।
चिनावल,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथुन जवळच असलेल्या कुंभारखेडा ता रावेर येथे दि ६ एप्रिल ते १३ दरम्यान श्रीमद् दशावतार कथा ( संजीव देखाव्यात सह ) व कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
कुंभारखेडा येथील राम कृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी च्या सहकार्याने महामंडलेश्वर सतपथा चार्य जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन भव्य सजीव देखावा सह सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे
यात दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती ,६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम , दुपारी १२ ते ५ श्रीमद् दशावतार कथा , सध्या काळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन होईल तर दररोज दि ६ रोजी कथेत मत्स्य अवतार भक्त रूक्मानद चरित्र तर रात्री ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन ,दि ७ रोजी वराह अवतार , भक्त प्रल्हाद चरित्र रात्री प्रल्हाद शास्त्री , सिन्नर यांचे किर्तन ,दि ८ रोजी वामन अवतार भक्त कमळाबेन चरित्र परशुराम चरित्र ,श्री राम जन्मोत्सव रात्री हरिदास महाराज ,दि ९ रोजी सिता स्वयमवर ,भक्त शबरी चरित्र रावण वध , श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री दिपक महाराज धरणगाव दि १० रोजी श्रीकृष्ण चरित्र , रुक्मिणी स्वयंवर रात्री रामेश्वर महाराज आळंदी ,दि ११ रोजी संपूर्ण महाभारत , बुद्ध अवतार चरित्र , रात्री डॉ जलाल महाराज करंजीकर ,दि १२ रोजी भक्त पांडवांचे स्वरगारोहण , भक्त सुदामा चरित्र व निष्कलंकी अवतार चरित्र रात्री विजय महाराज मुक्ताईनगर , दि १३ रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन हभप तुकाराम महाराज चिचोल दुपारी १२ ते ५ महाप्रसादाचे आयोजन तर सध्या ६ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर कथेला परिसरातील टाळकरी ,विणेकरी ,गायक व भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे सदर सत्संगाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कुंभारखेडा येथील राम कृष्ण हरी भजनी मंडळ व कुंभारखेडा ग्रामस्थांनी केले आहे