आमोदा – विरोदा रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या काटेरी झुडुपांची सफाई
विरोदा, ता. यावल.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील आमोदा ते विरोदा ह्या रस्त्यावर दोन्ही साईडने काटेरी झाडांचे अतिक्रमण झालेले होते .त्यामुळे रस्त्याने येणारा जाणाऱ्यांसाठी समोरून येणारे वाहन दिसत नव्हते .मागे बऱ्याच वेळा छोटे अपघात होऊन बरेच जण जखमी झाले .त्यामुळे हे काटेरी झुडपे काढणे महत्त्वाचे होते .ते आज बुधवारी काढण्यात आले .
आमोदा विरोदा रस्ता हा नागरिकांसाठी व शेतासाठी फार महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यामुळे मुक्ताईनगर थोरगव्हाण उदळी तसेच छोट्या मोठ्या गावांना येण्या जाण्यासाठी या रस्त्याचा वापर नागरिक करतात .तसेच रात्री बे रात्री भुसावळ येथे जाण्यासाठी विरोदा येथील नागरिक याच रस्त्याचा वापर जास्त करत असतात. या रस्त्यावर रात्री सरपटणारे प्राणी किंवा विंचू असे विषारी प्राणी समोरून येताना बऱ्याच जणांनी पाहिले त्यामुळे ह्या रस्त्यावरील काटेरी झुडपे हे रस्त्यापर्यंत येऊन गेलेले होते हे काढणे आवश्यक होते त्यामुळे गावातील सुज्ञ नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधून रस्ता साफ करण्या साठी मागणी केली त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांची संपर्क साधून रस्ता साफ करण्याबाबत सूचना दिल्या व आज बुधवारी सदर रस्त्याच्या दोन्ही साईटवरील काटेरी झुडपे हे जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले .यावेळी विरोदा गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश बऱ्हाटे,अमोल वारके, पंकज बऱ्हाटे व नागरिक उपस्थित होते
