ऐनपुर महाविद्यालयात स्वच्छतेची घेतली शपथ
ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे ‘एक दिन, एक घंटा, एक साथ राष्ट्र स्वच्छता’ अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी – विद्यार्थिनींनी स्वच्छतेची शपथ घेतली.
या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.रेखा पाटील, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जे.पी. नेहेते. प्रा. डॉ.पी. आर. गवळी , प्रा. प्रदीप तायडे यांनी शपथ ग्रहण केली . सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
शेवटी महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आला.
