यावल तहसील मधील अव्वल कारकून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
यावल,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मुक्तार तडवी ला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने यावल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
- सावदा केंद्राचा विज्ञान शाखेचा १००% तर कला शाखेचा ७३% निकाल, निकालात मुलीची बाजी …!!
- कोटेचा महिला महाविद्यालयाची बारावीची यशाची परंपरा कायम….
- आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर आगारात ५ नवीन एसटी बस दाखल
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने,काम करण्याचा मोबदल्यात यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याला लाचलुचपत विभागाने ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली,या करवाईमुळे यावल तहसील कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याची चैकशी सुरू आहे.