जळगाव

महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी नैराश्यात येऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर मध्ये सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली.

विशाखा गौतम सोनवणे (वय १९, रा. छ. संभाजीनगर, जळगाव) ही मुलगी जळगाव शहरातील आयएमआर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी विशाखा हि संध्याकाळी घरी होती. तिची आई वरच्या मजल्यावर असताना विशाखाने घराच्या खालील खोलीत छताला गळफास लावून घेत आत्महत्या
केली. झालेली घटना समजताच नातेवाईकांनी विशाखाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

तिनें आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नसून या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .मयत तरुणी आई, वडील, एक भाऊ, एक बहीण यांचे सह राहत होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!