फैजपूर मध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील तरुणाला अटक
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय विवाहितेवर घरात कोणी नसल्याची संधी साधून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून त्याच प्रमाणे महिले सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याच्या कारणावरून जळगावच्या तरुणावर फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.सदर तरुण हा महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.
सदर पीडित महिला ही आपल्या कुटुंबासह फैजपूर येथे राहतात. दीपक तायडे ३२ वर्षीय हा जळगावात गेंदालाल मिल भागात राहतो. याने पीडित महिलेवर दि. २० जून २०२४ रोजीपासून ते १७ मार्च २०२५ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले. तसेच दि. २० जून २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी येवुन तिचे तोंड दाबुन बेडरुममध्ये जबरदस्तीने घेवुन गेला. जबरदस्तीने वहिनीवर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर वेळोवेळी महिलेच्या घरी कोणी नसतांना पुन्हा बळजबरीने फिर्यादी महिलेच्या संमतीवाचुन शारिरीक संबध केले आहे. त्यांनतर फिर्यादी पीडित महिलेने त्याचेसोबत बोलणे पूर्ण बंद केल्याने संशयित आरोपी याने महिलेचे सोबतचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करुन समाजात बदनामी केली, म्हणून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक प्रभाकर तायडे या ३२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.


