भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिड्डे यांच्या कथित वक्तव्याचा निषेध; चौकशी व कारवाईची मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | पशुवैद्यकीय अधिकारी, दक्षिण सोलापूर येथील डॉ. धनाजी गिड्डे यांनी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाबाबत कथितरीत्या केलेल्या मानहानीकारक वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पद हे अराजपत्रित तांत्रिक पद असुन पशुसंवर्धन भागातील पशुवैद्यकीय सेवेचा ग्रामीण स्तरावरील मुख्य भाग असुन राज्यातील धवल क्रांती मध्ये मुख्य भुमिका साकारणारे पद आहे.संबधित प्रकरणी डॉ.गिड्डे यांचे नैतिक जबाबदारीचे अधःपतन झाल्याचे दिसून येते.या संदर्भात पशुचिकित्सा व्यवसायी संघटना व पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवासंघ, जळगाव यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

संघटनेने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास डॉ.धनाजी गिड्डे यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कथित वक्तव्याचा जळगांव च्या खाजगी व शासकीय संघटना तसेच राज्य संघटना यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला असून, या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अथवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून, चौकशी अंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!