कॉपी मुक्त अभियान : रावेर प्रभारी तहसिलदारांची सावदा येथील परीक्षा केंद्राला सर्वात आधी भेट
सावदा , ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | एच एस सी बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच आज पासून सुरु झाल्या असून आज पहिल्याच दिवशी रावेर तहसील कार्यालयाचे कॉपी मुक्त अभियान अंतर्गत असलेले पथकाने आज पहिल्याच दिवशी सावदा परीक्षा केंद्राला सर्वात आधी भेट दिली.
बारावी परीक्षेच्या आज पहिलाच दिवस असून राज्यात कॉपी मुक्त परीक्षा व्हायला पाहिजे म्हणून विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात भरारी पथक, बैठे पथक अशा पथकांच्या नेमणुका स्थानिक, तालुका अशा स्तरावर करण्यात आल्या असून आज पहिल्याच दिवशी रावेर तहसील कार्यालयाचे पथकाने सावदा येथे एच एस सी बारावी सेंटर श्री आ ग हायस्कूल येथे भेट दिली. या पथकात रावेर श्री संजय तायडे प्रभारी तहसीलदार रावेर, फिरोज खान मंडळ अधिकारी सावदा,राशिद तडवी तलाठी सावदा, आनंद शिंदे तलाठी रनगाव, अजय महाजन तलाठी उदली. अभिजित डांगे तलाठी थोरगव्हान, मोमीन अप्पा तलाठी रायपूर,रवी वानखडे . मंडळ अधिकारी निंभोरा., राशीद तडवी तलाठी दसनूर,दुर्गेश भालेराव तलाठी निंभोरा, भारत वानखेडे तलाठी विवरा आदी उपस्थित होते.

