भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं…मुंबईकरांचं टेन्शन वाढलं…

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कोरोना… म्हटलं की मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स…लॉकडाऊन .. नाव जरी ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते…आता पुन्हा एकदा कोरोनानं मुंबईत डोकं वर काढलंय. मुंबईत कोरोनाचे तब्बल ५६ रुग्ण आढळून आले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झालायं… आणि मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आलीय….त्या मुळे मुंबईकरांचं मोठं टेन्शन वाढलंय…..आता पुन्हा कोरोना दाराबाहेर उभा आहे. मुंबई मध्ये रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी केलंय.

सेव्हन हिल्स रुग्णालयात २० आयसीयू बेड तर कस्तुरबा हॉस्पिटलमध्येही ११२ बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळं घाबरुन न जाता कोरोना पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?
नागरिकांनी मास्क वापरावा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्या. हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा असे आवाहन करण्यात आले असून कोरोना कितीही घातक असला तरी त्याला रोखणं अशक्य नाही.. ..मात्र त्यासाठी प्रत्येकानं काटेकोरपणे नियम पाळायला पहिजेत.. जर कोरोनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत गेले तर मात्र लॉकडाऊन अटळ आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!