भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

मुलांना शाळेत पाठवण्यास ६२ % पालकांची तयारी नसल्याचे सर्व्हेत उघड !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थितीती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे दररोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.

लोकल सर्कल्सने केलेल्या सर्वेनुसार ६२ टक्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच केवळ ६ टक्के लोकांना पुढच्या दोन महिन्यांत आपण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संसर्गाची भीती एवढी आहे की, त्यामुळे ९४ टक्के लोकांनी पुढच्या दोन महिन्यांनंतरसुद्धा चित्रपटगृहात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.

देशात सध्या अनलॉक ३ सुरू असून, अनलॉक ४ ला १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र केंद्र सरकारने अनलॉक ४ साठीची नियमावली जारी केलेली नाही. दरम्यान, या सर्व्हेमध्ये २६१ जिल्ह्यांमधील २५ हजार लोकांचा कल जाणून घेण्यात आला होता. यामध्ये ६४ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिलांचा समावेश होता. यामध्ये १ सप्टेंबरपासून लोकलसेवा सुरू झाल्यास तुम्ही ६० दिवसांनंतर प्रवास करणार का, असा प्रश्न विचारला असता ३६ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर ५१ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिले. उर्वरित १३ टक्के लोकांनी याबाबत काही निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे सांगितले.  या सर्वेमधून लोकल तसेच मेट्रो प्रवासाबाबतही लोकांचा कल जाणून घेण्यात आला. त्यामध्ये सुमारे ६४ टक्के लोकांनी आपण दोन महिन्यांनंतरसुद्धा मेट्रो किंवा लोकलने प्रवास करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले. तर केवळ ३६ टक्के लोकांनी मेट्रो किंवा लोकलने प्रवास करण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!