भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्य

अंत्यसंस्कारा पूर्वी वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी चेहऱ्यावरुन कपडा हटवला आणि मुलगा हादरलाच!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ग्वाल्हेर वृत्तसंस्था: देशात कोरोनाने थैमान घातले आहे अनेक कुटुंबातील सदस्यांच्या कोरोनाने मृत्यू होत आहे. अशातच आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. शनिवार रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना दुसऱ्याचा मृतदेह सोपवण्यात आला. कुटुंबीय स्मशानात अत्योष्टीसाठी मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी करीत होते. मुखाग्नी देण्यासाठी जेव्हा मुलाने वडिलांच्या चेहऱ्यावरुन कपडा हटवला तर त्याला धक्काच बसला. तो मृतदेह त्याच्या वडिलांचा नाही तर दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले आहे.

समाधिया कॉलनीत राहणारे ६२ वर्षीय छोटे लाल कुशवाह निवृत्त झाले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय गेले तेव्हा त्याच्या वडिलांचा मृतदेह देण्यात आला. कुटुंबीयांना जो मृतदेह सोपवण्यात आला होता तो बांधलेला होता. बाहेर वडिलांच्या नावाचा कागद लावला होता. कुटुंबीय मृतदेह घेऊन मुक्तीधामपर्यंत पोहोचले. स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही तेथे पोहोचले. मृतदेह उतरून अर्थीवर ठेवण्यात आला. सर्व विधी केल्यानंतर मुलाने वडिलांचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जेव्हा त्याने वडिलांचा चेहऱ्यावरुन कपडा हटवला, त्याला धक्काच बसला. हा मृतदेह त्याच्या वडिलांचा नव्हता तर दुसऱ्या अनोळखी इसमाचा तो मृतदेह होता. या प्रकाराने कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार रोखण्यासाठी तत्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रार केली. हे ऐकून डॉक्टर आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर छोटेलाल मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली. तब्बल 2 तासांनी त्यांना मृतदेह सापडला आणि कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सुपूर्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!