लाच प्रकरणात जप्त केलेल्या नोटा उंदरांनी खाल्ल्या, या दाव्याने कोर्ट आश्चर्यचकित
नवी दिल्ली. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लाचेच्या सापळ्यात लाच म्हणून घेतलेल्या नोटा जप्त केल्या. मात्र जप्त केलेल्या चलनी नोटा उंदिरांनी खाल्ल्याच्या पोलिसांच्या दाव्यावर तीव्र आश्चर्य व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या पुरावा जतन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी अरुणा कुमारीस याना १० हजारांची लाच घेताना पकडले होते. विशेष न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. खटलाच्या वेळी जप्त नोटा उंदरांनी खाल्ल्या असे विशेष न्यायालयास पोलिसांनी सांगितले होते.
जप्त केलेल्या चलनी नोटा उंदिरांनी नष्ट केल्या या दाव्याने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. नोटा नष्ट झाल्याबाबत दिलेले स्पष्टीकरण विश्वासार्ह वाटत नाही. अशा प्रकारच्या घटना किती प्रमाणात घडतात आणि जप्त माल सुरक्षित ठेवण्याची पोलिसांची यंत्रणा कितपत सक्षम आहे याचा अभ्यास आवश्यक आहे. अशी घटना राज्याच्या महसुलालाही मोठा फटका देणारी ठरू शकते, असे न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांनी म्हटले आहे. तसेच शिक्षेविरुद्धचे अपील सुनावणीसाठी आले तेंव्हा सुप्रीम कोर्टाने शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती देत आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले

