महाराष्ट्रराजकीय

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी करणारे “ते ” व्हिडीओ हटवा, न्यायालयाचे निर्देश

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. न्यायालयाने अनिल थत्ते यांना दणका देत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची बदनामी करणारे व्हिडीओ अनिल थत्ते यांनी हटवावेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे गिरीशभाऊ महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करणारा व्हिडीओ अपलोड केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यात थत्ते यांनी महाजन यांचे राज्यातील एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

कथित मुक्त पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या गगनभेदी या युट्युब चॅनलवर एका व्हिडिओमध्ये महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा आधार घेत एकनाथ खडसे यांनीही महाजन यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर महाजन यांनी या प्रकरणी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती.

गिरीश महाजन यांनी या आरोपांना खोटे आणि निराधार ठरवत, आपल्या सामाजिक प्रतिमेला हानी पोहोचल्याचा दावा केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही ठोस पुरावे न देता केलेले हे आरोप स्वीकारार्ह नाहीत आणि त्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी गिरीश महाजन हे न्यायालयात गेले होते. यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने अनिल थत्ते यांनी सोशल मीडियातून सदर व्हिडीओ काढून टाकावा असे निर्देश दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीशभाऊ महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!