भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रात्री खेळ चाले : रावेर व सावदा पोलीस स्टेशन हद्दीत गो-तस्करी जोमांत, महिन्याला लाखोंच्या हप्ते वसुलीची जोरदार चर्चा !

रावेर, मंडे टू मंडे न्युज चमू | तालुक्यात मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून मध्यप्रदेश मधुन रावेर मार्गे सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्य रात्री हि तस्कारी बिनदिक्कत सुरू आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असल्याची चर्चा परीसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून ‘रात्रीच हा खेळ चालत असुन’ यामुळेच जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश असतो. 

गायीला हिंदू धर्मात मातेचा दर्जा आहे आणि राज्यात गो तस्करीला बंदी असताना अत्यंत निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून प्राणी वाहतूकिचा कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या गो वंशाची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक दिवसाआड मध्यरात्री मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून पाल घाट मार्गे कोचूर गावामधून तर काही गो तस्कर बऱ्हाणपूर कडून रावेर मार्गे सावदा शहरात दाखल होऊन येथून बस स्टँड समोरील पोलीस चौकी जवळून काहीं फैजपूर कडे पुढें मार्गस्थ होतात तर काही सावदा शहरातून सावदा पोलीस स्टेशन समोरून स्टेशन मार्गे तर काही पोलीस स्टेशन मागील रस्त्यावरून पुढें मार्गस्थ होतात. महत्वाचं म्हणजे ज्या दोन्ही मार्गांनी तस्करी केली जाते त्या मार्गांवर पोलीस चौकी व पोलीस स्टेशन असूनही ही अवैध गो तस्करी होत असल्याने पोलीसांच्या भूमिकेवर भले मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होते.

परीसरात अशीही चर्चा आहे की, अत्यंत निर्दयपणे वाहनात ही जनावरे कोंबून अतिशय वेगवान स्पीडने वाहन चालवत त्यांचा प्रवास केला जातो. यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पोलीस जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे. गो तस्करांपुढे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे की काय असा प्रश्न गो प्रेमी विचार आहे. यामुळें गो वंशाची तस्करी रोखण्याचे मोठें आव्हान पोलिस प्रशासना समोर आहे. मुक्ताईनगरचे डीवायएसपी शिंदे व फैजपूर विभागाच्या डॉ अन्नपूर्णा सिंह यांच्यासह या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालून तस्करी रोकण्यासाठी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!