जळगाव मध्ये क्रिकेटचा जल्लोष ; ‘JCL 2026 – पर्व 2’ ची घोषणा
जळगाव/नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून, या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली.
या वेळी व्यासपीठावर अॅड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे व खजिनदार राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते.
Indian Premier Leagueच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणारी ही T20 स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर रंगणार आहे. दिवस-रात्र सामने, रंगीत कपडे आणि पांढऱ्या लेदर बॉलचा वापर ही स्पर्धेची विशेष वैशिष्ट्ये असणार आहेत.
“Own The Game, Lead The League, Build Legacy” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरणार आहे. मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन होईल आणि जळगावचा क्रीडागौरव अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष माहिती (Info Box)
स्पर्धा : जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2)
आयोजक : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
स्थळ : जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगण, कांताई नगर, मेहरुण
स्वरूप : T20 क्रिकेट (IPL धर्तीवर)
वैशिष्ट्ये : पांढरा लेदर
बॉल, रंगीत जर्सी,
दिवस-रात्र सामने
उद्देश : खान्देशातील खेळाडूंना व्यासपीठ
“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!”
जळगाव व खान्देशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी, तसेच स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळाडूंसाठी खेळाचा आणि व्यावसायिकांसाठी व्यवसायाचा हा उत्तम अवसर ठरणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून जाहीर केलेल्या खेळाडूंनाच नोंदणीनंतर सहभाग घेता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

