भुसावळात खून; चाकू हल्ल्यात तरुणांचा मृत्यू !
भुसावळ- शहरातील खडका चौफुलीवर रविवारी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास शेख अलतमस्त शेख रशीद या २० वर्षीय तरुणांच्या छातीवर अज्ञात इसमांनी धारधार चाकूचे पाच ते सहा वार केल्याची घटना घडली असून हल्ल्यात तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरात खुनाचा थरार पुन्हा घडल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, बाबला हॉटेल,कमलाबाई बिल्डींग मधील रहिवाशी शेख आत अलमश शेख रशीद या २० वर्षीय तरुणांवर अज्ञात इसमांनी खडका चौफुलीवर रविवार दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास धारधार चाकूने छातीवर पाच ते सहा वार करण्यात आले, तरूणाला जामनेर रोड वरील खाजगी रुग्णालयात आणले असता डॉ.मानवतकर यांनी तरुणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, सदरील खुनाची माहिती कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे, सपोनि अनिल मोरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांनी धाव घेतली, तसेच नातेवाईक व मित्र मंडळींची डॉ.मानवतकर यांच्या दवाखान्यामध्ये गर्दी जमल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आर.सी.पी. पथकांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून दवाखान्याच्या आवारात बंदोबस्त लावण्यात आला होता. गुन्ह्याचे आरोपी पसार झाले असून पोलीस प्रशासनाकडून कसून शोध केला जात आहे.