भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईम

Online Fraud: फेसबुकवरील मैत्रिणीवर विश्वास ठेवणं पडलं महागात; १० लाखांचा गंडा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसेवा: सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता जोधपूरचा एक व्यक्ती ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. या प्रकरणात त्याला 10 लाखाचा गंडा बसला आहे. जोधपूरच्या संजय कॉलनीमधील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त सैनिक खिवसिंहची काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील प्रियंका कुमार नावाच्या एका महिलेसोबत मैत्री झाली.

एक दिवशी प्रियंकानं सांगितलं, की माझे चुलते वाळूचं काम करतात. त्यांनी काम करताना एक चमकणारा धातू मिळाला. तपास केला असता ते सोनं असल्याचं समजलं. आम्हाला भीती वाटतीये की हे सोनं आमच्याकडून कोणीतरी लुटून किंवा चोरी करुन घेऊन जाईल. त्यामुळं, तुम्ही हे सोनं घ्या, हे सोनं आम्ही तुम्हाला स्वस्तात देईल. यानंतर खिवसिंह प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, आसाममध्ये पोहोचले, तिथेच प्रियंका त्याला घ्यायला आली. याठिकाणी खिवसिंहला प्रियंकाचे चुलचे भेटले. त्यांनी सोन्याच्या धातुचा एक तुकडा कापून खिवसिंह यांना दिला. खिवसिंह हा तुकडा घेऊन जोधपूर आला आणि सोनाराकडून याची तपासणी केली. तेव्हा त्याला समजलं की हे सोनंच आहे. यानंतर काही दिवसात प्रियंकाचा फोन आला आणि ती म्हणाली, की २ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे चुलते २० लाख मागत आहेत. मात्र, तुम्हाला १० लाखात देईल.

यानंतर ११ फेब्रुवारीला खिवसिंह आसाममध्ये गेले आणि १० लाख रुपये देवून तो धातू खरेदी केला. या धातूची सोनाराकडे तपासणी केली असता हे सोनं नसल्याचं समोर आलं. यानंतर खिवसिंहनं प्रियंकाच्या सगळ्या नंबरवर फोन केला मात्र तिचा फोन बंद होता. यानंतर त्यांनी प्रतापनगर ठाण्यात आपल्यासोबत झालेल्या या फसवणुकीसाठी रिपोर्ट दाखल केला. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!