माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची घरात घुसून हत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. ६७ वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील हत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मंगळवारी रात्री ही भयंकर घटना घडली आहे. किट्टी कुमारमंगलम दिल्लीतील वसंत विहार परिसरात वास्तव्यास होत्या. किट्टी कुमारमंगलम यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास इस्त्रीवाला घरी आला होता. त्यानंतर दोन अन्य व्यक्तीही घरी आल्याची माहिती या महिलेनी दिली. त्यानंतर त्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझे हात पाय बांधले आणि किट्टी कुमारमंगलम यांची हत्या केली. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांड प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. अद्याप हत्येचे कोणतेही कारण समोर आलेले नाही.
किट्टी कुमारमंगलम या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होत्या. त्यांचे पती पी. आर. कुमारमंगलम पहिल्यांदा १९८४ साली पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संसदीय मंत्री आणि कायदा, सुव्यवस्था कंपनी अफेर्स मंत्रालयाचे काम १९९१ ते ९२ दरम्यान पाहिले. ते १९९२ ते ९३ साली संसदीय कामकाज मंत्री होते. १९९८ साली ते देशाचे ऊर्जामंत्री होते.