जुन्या भांडणाची कुरापत : कुटुंबास कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी !
नाशिक, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा: शहरातील एका भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून कुटुंबास कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देणार्या चार पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी महिला दि. 6 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गजानन चौकातील कातर गल्ली येथील घरात जेवण करीत होती. त्यावेळी संशयित पप्पू कातारी ऊर्फ भोंड, भरत कातारी ऊर्फ भोंड (दोघे रा. कातार गल्ली, फुलेनगर), रवी (पूर्ण नाव माहीत नाही), छोटू (पूर्ण नाव माहीत नाही) हे चौघे जण फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसले. फिर्यादीच्या पतीकडे दीर अक्षय याच्याशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी महिला पतीला सोडविण्यासाठी गेली असता रवी याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले,
तसेच तिच्या गळ्यातील पोत व पाकिटात असलेले 7 हजार 800 रुपये हे बळजबरीने ताब्यात घेतले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या सासूला शिवीगाळ केली, तसेच कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गावित करीत आहेत.