“निजामाची अवलाद AIMIM ची मदत घेऊन जनाची नाही पण…”, ‘मनसे’ची महाविकास आघाडीवर जहरी टीका
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे इम्तियाज जलील (Imtiaz Jali)यांनी म्हटले आहे. यावरूनच मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
मनसेचा टोला
एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय. ‘राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे,’ असा टोला काळे यांनी लगावलाय. पुढे बोलताना त्यांनी, ‘त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे,’ असंही म्हटलंय.
एमआयएमनं काय म्हटलं?
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या असून एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी तसेच महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आले आहे.”