अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी, गुन्हा दाखल !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एका तरूणाला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून १७ हजाराची ऑनलाईन फसवणूक करून पुन्हा पैश्यांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तिघे जेरबंद
- जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या ; अपघाती मृत्यूचा बनाव पोलिसांनी उधळला
- खान्देश सुपुत्र डाॅ.पृथ्वीराज सैंदाणे याना मराठवाड्यात ( संभाजी नगर)येथे “महा अँक्युपक्चर रत्न पुरस्कार
एका ३१ वर्षीय तरुणाला रा. कासोदा ता. एरंडोल येथील फेब्रुवारी २०२१ ते ८ जून २०२२ दरम्यान, अनोळखी नंबरवरून अश्लिल मॅसेज व अर्धनग्न पाठवून चॅटींग करण्यात आले. तरूणाच्या मोबाईलवर खून केलेले, रक्तबांबाळ असलेले व्हिडीओ पाठवून तुझा देखील खून करून मृत्यू घडवेल अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून तरूणाने दिलेल्या फोन पे नंबरवरून २ हजार आणि १५ हजार असे एकुणन १७ हजार रूपये पाठविले.
पैसे दिल्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीला कंटाळून तरूणाने थेट दि. ९ जून रोजी दुपारी २.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.




