रावेर

रावेर तालुक्यात ५१९ हेक्टर वरील पिकांचे नुकसान

रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात रावेर तालुक्यात झालेल्या वादळी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार, नैसर्गिक आपत्तीत ४७ घरे पूर्णपणे, अंशतः पडली आहेत, त्याच बरोबर रावेर तालुक्यातील ३१ गावांमधील तब्बल ८८४ शेतकऱ्यांच्या सुमारे ५१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानी मुळे रावेर तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून,तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.

आज अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे, फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे आणि मंडळ अधिकारी धांडे यांनी शेत शिवारात जाऊन केळी बागांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान पाहणी करून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल आज जळगाव येथे पाठवण्यात आला आहे. लवकरच शासन स्तरावरून मदत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!