भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? शरद पवारांचे संकेत

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. जे इतक्या वर्षात झालं नाही ते आता होणार? पवारांच्या एका वाक्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. या मुळे महाराष्ट्रात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
आज सकाळपासून शरद पवार हे पुण्यातील मोदीबाग इथे आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी महत्त्वाचे राजकीय भाष्य केले. त्यांचं वक्तव्य हे पुन्हा राजकीय भूकंप करणार का अशी चर्चा सुरू झालीय.
शरद पवार यांनी म्हटले की, सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

या संदर्भात अजित पवार गटाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली, आमच्या पक्षात आम्ही एकत्रितपणे चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा असंही शरद पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी खासदारांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!