कंटेनरने चिरडले, रात्री उशिरा पर्यंत रस्ता रोको आंदोलन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रात्री एमएम ०९ एजी ११३८ क्रमांकाच्या कंटेनरने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिव कॉलनी स्टॉप जवळ रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिकांनी रोष व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत ही रस्ता रोको आंदोलन सुरू होते.
या घटने बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आशाबाबा नगरातील विजय नामदेव भाई, वय ५० वर्ष. यांची शिव कॉलनी स्टॉपजवळ पानटपरी आहे. काल रात्री ते साडेदहा ते आकारा वाजेच्या सुमारास दुचाकीने शिव कॉलनी स्टॉपजवळ महामार्गावरुन येत असतांना गुजराल पेट्रोल पंपाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक एमएम ०९ एजी ११३८ ने त्यांना चिरडत ५० ते ६० फुटापर्यंत चिरडत ओढत नेले. त्यातच विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील आशा बाबा नगर मधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या.