क्राईममहाराष्ट्रराष्ट्रीय

झाडे तोडणे हे मानवी हत्ये पेक्षा भयंकर कृत्य, दोषी व्यक्तीकडून झाडामागे एक लाख वसूल करा – सुप्रीम कोर्ट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | झाडे तोडणाऱ्या व्यक्तीविरोधात सुप्रीम कोर्टाने मोठा संताप व्यक्त केला आहे. ‘मोठ्या संख्येने झाडे तोडणे हे मानवी हत्येपेक्षा भयंकर कृत्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. बेकायदेशीररित्या तोडलेल्या प्रत्येक झाडामागे एक लाख रुपये दोषी व्यक्तीकडून वसूल करण्याचा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. या निर्णयाने बेकायदेशीर झाडे तोडण्याला आळा बसेल.

न्यायाधीश अभय एस ओका आणि न्यायाधीश उज्जल भुइंया यांच्या पीठाने झाडे तोडण्याची तुलना मानवी हत्येशी केली आहे. बेकायदेशीररित्या झाडे तोडणे आणि पर्यावरणाचं नुकसान पोहोचवणाऱ्या व्यक्ती दया दाखवू नका, असे सुप्रीम कोर्टाच्या पीठाने म्हटलं आहे.

शिवशंकर अग्रवाल नावाच्या व्यक्तीने मथुरा-वृंदावनमधील डालमिया फार्ममधील ४५४ झाडे तोडण्याचा गुन्हा केला होता. .’४५४ झाडे तोडलेल्या व्यक्तीचा गुन्हा हलक्यात घेऊ नका, असे कोर्टाने म्हटलं आहे. वरिष्ठ अधिवक्त मुकुल रोहतगी यांनी म्हटलं की, ‘शिवशंकर अग्रवाल यांनी त्यांची चुकी मान्य केली आहे. मात्र, कोर्टाने दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला आहे’.

न्यायाधीश अभय एस ओका आणि न्यायाधीश उज्जल भुइया यांच्या पीठाने ४५४ झाडे तोडणाऱ्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला. ‘व्यक्तीने परवानगीशिवाय ४५४ झाडे तोडली. आता ती झाडे नव्याने लावण्या कमीत कमी १०० वर्ष लागतील.

सुप्रीम कोर्टाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचा रिपोर्ट स्वीकारला आहे. मथुरा-वृंदावन येथील दालमिया फार्ममधील झाडे तोडणाऱ्या शिवशंकर अग्रवाल यांना प्रत्येक झाड तोडण्यामागे १ लाख रुपये दंड ठोठावण्याची शिक्षा रिपोर्टमध्ये नोंद आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने बेकायदेशीर रित्या झाडे तोडणाऱ्यांना हा मोठा दणका असणार आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!